Paratla tu.. Marathi Kavita
घेताच तू ती गाडी नवी, घेतलीच मी किल्ली झणी
चालवता ठोकली, तरी रागावला तू नाहीस रे !
'पार्टीसाठी ये' सांगताना, 'फॉर्मल' शब्द विसरले
आलास 'कैजुअल' तरी संतापला तू नाहीस रे !
न पटल्याने माझी मते, पाट फिरवती सगळे
पाठिंबा प्रसंगी अशाही बदलला तू नाहीस रे !
एकाहून सुंदर एक, अशा कैक तुझ्या मैत्रिणी
माझा साथ विश्वास, कधी बहकला तू नाहीस रे !
तुज्यासवे मी बावरता, आई बाबा नव्हती चिंता
प्रेमास त्या अपात्र असा ठरलाच तू नाहीस रे !
पारखल्या प्रेमा तुझ्या मी, स्वीकारले माजिया मनी
सोबती आयुष्याचा माझ्या म्हणू कसे तू नाहीस रे ?
ही व अशी कैक गुपिते, सांगायची होती तुला रे
युद्धाहुन तू परतल्यावर पण ......
परतला तू नाहीस रे ......