© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

कणा My Favorite Marathi Poetry on Life by Kusumagraj

Marathi Kavita on Life


kana-marathi-kavita-on-life

ओळखलत का सर मला! पावसात आला कोणी?
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी...
क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा!

- कवी कुसुमाग्रज
 

AddThis