संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही
Short Bodh Katha in Marathi Writing with Moral
सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते
जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते.
द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते
वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते
राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते;
जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते
लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता;
पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते
श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते;
जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते,
लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते;
पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते,
शरशय्या वरती भीष्म पितामह होते;
वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते
राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते;
पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते,
सर्वांसाठी, त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे,
या जगात आपले कोणी ही नाही.
ज़े विधात्याने लिहिले, आणि जसे आपले कर्म आहे, त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हेच सत्य आहे.
केवळ कर्मच आपले आहे, देवापेक्षा कर्माची भिती बाळगावी, एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही.