© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Kavita for Love & Lover एक वेगळाच आनंद आहे..!Love Marathi Kavita


जाते आहेस हरकत नाही 
कढत अश्रु पाहून जा 
नाते तोडतेस हरकत नाही 
विजता श्वास पाहून जा 
जाणून सारे संपवताना 
हीच एवढी विनंती 
हसते आहेस हरकत नाही 
बुड़ती नाव पाहून जा 
जाळते आहेस हरकत नाही 
जळणारे गाव पाहून जा

Love Marathi Kavita 1

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
खर प्रेम....
म्हणजे काय असतं...!!!!
खरच याला खरे प्रेम म्हणतात ?
ज्या ज्या वेळेस तुम्ही कुणा खास व्यक्ती बरोबर असता,
त्या त्या वेळेस तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवता..??
पण ....
ज्या वेळेस ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते,
त्या वेळेस तुमची नजर त्यालाचं शोधत असते..
यालाच खर प्रेम म्हणतात का ???

prem Marathi Kavita 1

कुणीतरी विचारले तिला, " तो " कुठे आहे....?
हसत हसत उत्तर दिले तिने,
माझ्या श्वासात...
माझ्या हृदयात...
आणि माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
तो आणि फक्त तोच आहे !
यावर पुन्हा तिला विचारले गेले कि, " तो " कुठे नाही......??
तिच्या भरून आलेल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर सांगितले ...

माझ्या नशिबात ... आणि माझ्या आयुष्यात....

 

AddThis