© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Great Marathi Kavita | Poem for Mother | Aai | Mom for Mother Day


Marathi Kavita on Aai


आई 
आई साठी काय लिहू 
आई साठी कसे लिहू 
आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे 
आई वरती लिहिण्यैतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे 
जीवन  हे शेत तर आई म्हणजे विहिर 
जीवन  हे नौका तर आई म्हणजे तीर 
जीवन  हे शाळा तर आई म्हणजे पाटी 
जीवन  हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी 
आई तू उन्हामधली सावली 
आई तू पावसातली छत्री 
आई तू थंडीतली शाल 
आता यावीत दुःखे खुशाल 
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस 
आई म्हणजे अंगनातील पवित्र तुळस 
आई म्हणजे भजनात गुनगुनावी अशी संतवाणी 
आई म्हणजे वाळवंटात प्याव अस थंडगार पाणी 
आई म्हणजे  आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाली 
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

marathi kavita or poem for aai or mother

"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!

- - -

सकाळी सकाळी धपाटे घालुन उठवते.. ती असते आई
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते.. ती असते आई
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी करते.. ती असते आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ काही आवडीचे करून देते.. ती असते आई
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते.. ती असते आई
परतण्याची आतुरतेने वाट बघत बसते.. ती असते आई
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते.. ती असते आई
आणि जिच्याशिवाय आपल संपूर्ण आयुष्यच अपूर्ण असते ..
ती असते आई..! 
ती असते आई..!

 

AddThis