© 2019 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

पावसाची आणि त्याची ! Marathi Kavita on Rain | Paus


Poem on Rain in Marathi


पावसाची आणि त्याची,
जरा वेगळीच मैत्री होती...
जुन्या त्या कप्यात,
आठवणीतली ओली छत्री होती...!!!
पावसाच्या संतत धारांशी त्याची,
ओळख फार जुनी होती...
ती समोरुन येऊन धडकन्यात पण,
बहुदा त्याचीच काहीतरी खेळी होती...!!!
भेट ती पहिल्या पावसातली,
जन्मभर पुरणारी होती...
कारण दोघांच्याही हृदयातली धड़धड़,
सारखीच वाढली होती...!!!

Poem on Rain in Marathi

तिने भेट म्हणून दिलेली छत्री,
त्याला रे अगदीच प्रिय वाटत होती...
ती नसतांनाही तीच त्याची,
सखी-सोबती बनून मिरवत होती...!!!
त्याच छत्री खाली दोघांची,
अवखळ नजर भिडली होती...
तिच्या हातात हात घालून फिरतांना,
हुरहुर मनात वाढली होती...!!!
एकाच छत्रित फिरणा-या दोघांना,
आयुष्यभराची सोबत मिळणार होती...
पावसानेच नकळतपणे,
ही जोड़ी जमवून आणली होती...!!!
कारण पावसाची आणि त्याची,
जरा वेगळीच मैत्री होती..........!!!!!

 

AddThis