© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Suvichar in one line | सुविचार मराठी

Marathi Good Thoughts


माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. 
- आयझॅक न्यूटन

✔✔✔✔✔

पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल.... 
Dr-APJ-Abdul-Kalam
- डाॅ. अब्दुल कलाम

✔✔✔✔✔

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. 
- कल्पना चावला

✔✔✔✔✔

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे. 
- सर्वपल्ली राधाकृष्णन

✔✔✔✔✔

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. 
- विश्वनाथन आनंद

✔✔✔✔✔

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. 
- धीरूभाई अंबानी

✔✔✔✔✔

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. 
- नारायण मूर्ती

✔✔✔✔✔

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो. 
- बिल गेट्स

✔✔✔✔✔

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. 
- बराक ओबामा

✔✔✔✔✔

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. 
- जे. आर. डी. टाटा

✔✔✔✔✔

जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. 
-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

✔✔✔✔✔
 

AddThis