© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Kavita And Marathi Kavita Images For Marathi Lokansathi

मराठी कविता 

   
सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही मग माशाची भागात नाही तहान 

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप 
वाटी - वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तूप 

बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ 
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ 

Career होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र 
बापाची ओळख मुलं सांगती पैसे छापायचं यंत्र 

चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वतःच्याच घरी 
दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी 

मुलंच मग विचारू लागतात बाबा अजून काहो घरी ?
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी

क्षणिक ऒदासिन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र 
Career Career दळण दळता, स्वाथ्य होतं वक्र 

सोनेरी वेळी वाढत जातात, घराभोवती चढलेल्या 
आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या 

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही 
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही 

सगळ काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं    

 

AddThis