© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.
Showing posts with label Nuste ladh mhana. Show all posts
Showing posts with label Nuste ladh mhana. Show all posts

Marathi Kavita for Children ओळखलतं का सर मला..


Children's Poem in Marathi


'ओळखलतं का सर मला' पावसात आला कोणी 
कपडे होते कर्दमलेले केसवरती पाणी 
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून;
'गंगामाई' पाहुनी आली, गेली घरट्यात राहुन 
माहेरवाशिन पोरसारखी चार भिंतीत नाचली 
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली 
भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले 
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे 
पड़की भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे 
खिशयाकडे हात जाताच हसत हसत उठला 
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा 
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा

 

AddThis